मधुर गीत तू मम हृदयाचे
सूर न तव थांबावे ऐकताना
क्षण एकदाच स्तब्ध व्हावे
मधुर शब्द तव ऐकताना
मधुर बोल तुझे प्रीतीत रमलेले
संगीत मज मधुर ऐकताना
सुखदुःख क्षणात विरुनि जावे
मन तुझ्यातच गुंतताना
स्मित हळूवार स्पर्शावे मनास
प्रेममुग्ध नयन तव पाहताना
विचारयज्ञात अन्य प्रेमकाव्य: