कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...
चंद्रासवे चालताना
तुझ्या स्वप्नांत रमताना
काय सांगू काय जादू होते
चंद्र हसताना माझं हृदय सांगतं,
'तू आता चंद्रासच बघतोयस'
दुधाळ चंद्रप्रकाश पाहताना
हृदय म्हणतं,
'तू माझाच विचार करतोयस
जसा मी तुझा
वेडंय ना हे हृदय, खरंच?'
आणि तो गुलाबी चंद्र
चंद्र ही प्रेमात वेडा होतो
प्रेमात गुलाबी होतो
वेडंय ना हे हृदय, खरंच?
आणि जेव्हा स्मित उमलतं ओठी उगाचंच
मन म्हणतं
तुंझ्या ओठीही स्मित फुललंय कुठेतरी आताच
डोळे उगाचंच रडतात कधी कधी
तुझ्या काळजीने
मन म्हणतं,
'तू ठीक तर आहेस ना?'
हृदयाच्या भाषेला शब्द लागत नाहीत
हृदय मीलनास काळाचे - जगाचे बंधन नाही
वेडे हृदय तुझ्या प्रेमातच मग्न राहते
पहाटेचे दवबिंदू जसे
गोड गुलाबी गुलाब पाकळ्या जशा
हळुवार वाऱ्याची झुळूक जशी
हरिणाचे भाबडे पिलू जसे
भिरभिरते सुंदर फुलपाखरू जसे
वेड्या हृदयाचे प्रेम वेडेच तसे
कसं सांगू किती वेळा हृदय तुझ्याशी बोलतं
किती वेळा तुला सांगतं
तुझ्यावर किती प्रेम करतं ते
तुलाच सगळीकडे शोधत असतं ते
अबोल प्रेम व्यक्त करता येत नाही
आणि
हृदयाला ओठांसारखं बोलता येत नाही
पण हृदयाला प्रेम मात्र करता येते न बोलता
खूप खूप मनापासून
तुझ्यावर
आणि एक गोष्ट सांगू?
सोनेरी चंद्रप्रकाशात नहाताना
हृदय काय म्हणतं?
' तू आणि मी आता 'एक' आहोत
त्या पवित्र सोनेरी प्रकाशात'
त्या दिव्य पवित्र प्रेमात
नाही, हे हृदय वेडं नक्कीच नाही
हे प्रेमच तर आनंद आहे जीवनाचा
जीवनाच्या सार्थकतेचा
आणि
मधुर मिलनाचा
ही कविता इंग्रजीत:
अन्य प्रेमकविता: