विरहाचे दु:ख व्यक्त करणारे काही भाव...
तुझ्याशिवाय
आयुष्य
एक भळभळती जखम
~~~~~~o~~~~~~~
तुझ्याशिवाय
अशक्य जगणे
एकही क्षण
~~~~~~o~~~~~~~~
आज होत नाही
काव्य या शब्दांचे
काय हरवलंय?
माझं हृदय की तू?
~~~~~~~o~~~~~~~
तुझ्याशिवाय
ठोके थांबलेत रे!
हृदयाचे
~~~~~~~o~~~~~~~~
दु:खी मी जरी
विसरले नाही तुला
तुझ्याशिवाय असूनही
तुझी मैत्रीच तर आहे
स्मित देण्या या ओठांना
~~~~~~~~o~~~~~~~~~
हे वेडे अश्रू
का थांबत नाहीत आज?
अजूनही
तुलाच बोलावतात!
~~~~~~~~o~~~~~~~~~
हे घड्याळ पळतंय
पळत्या आयुष्याबरोबर
काळ मात्र थांबलाय
तुझ्यावाचून!
माझ्यासाठी
मी मात्र थांबलेय
तुझ्यावाचून
तुझ्यासाठी!
~~~~~~~~~o~~~~~~~~~
किती क्रूर वागलास!
माझ्याशी की स्वत:शीच?
वेगळे होतोच कधी रे आपण?
आपल्या आयुष्यालाच
कुणी रे बनवलंय
एक भळभळती जखम
~~~~~~~~~o~~~~~~~~~
हे अश्रुआड दडलेले
तीव्र दु:ख
कधीच सांगत नाहीस तू!
तुझ्यावाचुनच
वाचतेय रे मी!
या हृदयाच्या डोळ्यांनी
अश्रुंनी धुतलेल्या
हृदयाच्या या जखमांनी
दु:ख तुझे नि माझे
आपल्या विरहाचे
~~~~~~~~~~o~~~~~~~~~
हे अश्रू
थांबायलाच तयार नाहीत
तुझ्यावाचून
ऐकतोयस न तू?
~~~~~~~~~~o~~~~~~~~~~