उद्या मोक्षदा एकादशी म्हणजेच गीता जयंती आहे. गीता जयंतीस वैश्विक गीता जयंती पारायण समारोह आपण सगळे फेसबुकच्या माध्यमातून करूयात. पारायण आपापल्या घरी करावयाचे आणि त्याची नोंद पुढील event वर द्यावी. आपण सर्व या समारोहात अवश्य या. गीतेची जास्तीत जास्त पारायणे उद्या म्हणजे १३ डिसेम्बर ला व्हावीत.
कारण गीता धर्मयुद्ध करण्यास्तव प्रेरणा आहे.
गीता ज्ञान, कर्म आणि भक्तियोग यांचा संगम आहे.
गीता प्रत्येकासाठी आहे.
गीता साक्षात जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांची वाणी आहे, साक्षात त्यांचा उपदेश केवळ आपल्यासाठी.
काही विद्वान म्हणतात, नुसती संस्कृत गीता वाचून काय होणार?
खरे सांगू...वाचून पहा. न समजताच वाचून पहा ...बस एकदाच..वेड लावेल तुम्हाला. पुढे काही करायची आवश्यकता नाही. कारण कृष्णवेडच असे आहे. आणि अर्थ वाचायची, समजून घ्यायची इच्छा होतेच.
संस्कृतपाठाने जो प्रभाव निर्माण होतो...तो एकदा आणि उद्याच अवश्य अनुभवा.
आपल्या पारायणाची नोंद...खालील दुव्यावर अवश्य करा...
फेसबुक वर सामील व्हा : गीता जयंती महोत्सव
शक्य असेल तितके गीता पठण करेनच.
ReplyDeleteधन्यवाद कांचन. :) प्रतिक्रिया प्रसिद्ध करायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. :)
Delete