सगळे वादविवाद आणि तर्क जिथे संपतात ते म्हणजे अद्वैत. अद्वैत शाश्वत शांती प्रदान करणारे आहे. आपण भारतीय अतिशय पुण्यवान आणि भाग्यवान आहोत की आपला जन्म अद्वैताच्या या भारत भूमीत झाला.
निर्गुण उपसाकासी जे ब्रह्म
सगुण साकार उपासकां
तोचि श्रीराम
साकार आणिक निराकार
उपासना बाह्य भेद केवळ
एक तत्त्व त्यापलीकडे
श्रीराम माझा राही जेथे
जाणल्यावरी श्रीराम एकदा
दुःख नुरे पुन्हा कदा
म्हणुनी भजावा श्रीराम सर्वदा
वाद व्यर्थ सांडूनी पूर्णता
श्रीराम न विषय तर्काचा
विषय न ब्रह्म बुद्धीचा
साधना दृढ, समर्पण पूर्ण
त्यासी भेटे श्रीराम पूर्ण
ज्ञान दिव्य घेई जन्म
दुःख मिटे मिळे आनंद पूर्ण
भेद सकळ, तर्क विकळ
सांडता भक्ती मिळे पूर्ण
ज्ञान, भक्ती न भेद काही
सत्य सनातन अद्वैत पाहि
अद्वैत हेच सार जीवनाचे
अद्वैत सार अध्यात्माचे
विचारयज्ञात प्रभू रामचंद्रांस अर्पण अन्य स्तोत्रे: