एक शक्ती सर्व जगति
कार्य करण्या भरली आहे
कार्य सदा करीत असुनी
ती अचल बनुनि राहे
प्रकाशमान सदा आहे
चंद्र बनुनि शितल तीच
निशा प्रकाशुनी आहे
वायुरूपी तीच जगती
व्यापुनी हे विश्व आहे
श्वास बनुनि हर शरीरी
तीच चलायमान आहे
जड हि तीच अचल राहुनि
व्याप्त सर्व स्थानी आहे
साकार होऊनी क्षण क्षण
तीच दर्शन देत आहे
निराकार ती कर्मरूपे
पुन: पुन्हा अभिव्यक्त आहे
सर्वरूपी सर्वस्थानी
एक शक्ती तीच आहे
जगन्माता जगत्पिता
शक्ती तीच सर्व आहे