जाहले मज दर्शन मातेचे
अंतरीच प्रकटले रूप लक्ष्मीचे
मी न हीन - दीन लाचार
जगन्माता हृदयी मम साचार
मी न मुळी सामान्य
जन्म - मरण चक्र मज मुळी अमान्य
आज सुटले पूर्ण या संसारातुनि
पाश सारे तुटले पूर्ण हृदयातुनी
हृदय असे हे पूर्ण भरले आनंदाने
भवबंधानासवे शोक गेले पूर्ण वाहुनी
शोकाची बाधा मजला कधीच नव्हती
भ्रमास मोठ्या सत्य मानुनी मी जगले
आणि जीवन माझे जरा भरकटले
भरकटले - सावरले हा हि भ्रमची केवळ
आनंदस्वरूप माझे हेचि सत्य केवळ
Comments
Post a Comment
हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........