साधना


सिद्धयोग साधनेबद्दल हृदयाचे काही बोल , ज्या साधनेने माझं जीवन परिपूर्ण बनवलं, पण जी साधना कधीच पूर्ण होऊ शकत नाही , अशा आत्मनिवेदन रूप भक्तीचे हे सर्वश्रेष्ठ रूप. जीवनाच्या प्रत्येक क्षणी अनुभवताना काय आनंद होतोय ते शब्दात बांधणे तर शक्य नाही , पण तरी हि छोटीशी अभिव्यक्ती !


साधना हेच जीवन माझे 
साधना हेच सर्वस्व माझे 
हर श्वास माझा साधना
बोलीतो हा 'प्राण' साधना 
गुरुरायांनी हा ठेवा दिधला 
अमोलिक हा खजिना दिधला 
सुटुनी गेले बंध नाते 
तुटुनी गेले पाश सारे 
एक साथ जी कधी तुटेना 
एक हात जो कधी सुटेना 
ती हि दिव्य 'महा'साधना 
प्राणपूजा हि आत्मपूजा 
जीवनाचा आता अर्थ उमगला 
हर क्षण साधना साधनच झाला 
प्रेम हे साधे विश्वा आवडले 
साधनेने मज सर्वस्व मिळाले 

Comments