एक कळी पुन्हा बोलली


खूप दिवसांनंतर आपल्याशी बोलतेय. खरंच क्षमस्व. मध्ये जरा बरं नव्हतं आणि बरेच दिवस नेट पण बंद होतं. त्यामुळे बराच वेळ गेला. 


एक कळी पुन्हा बोलली 
लाजता लाजता कळी खुलली 
गुलाबी गुलाबी गालांवर 
लाली आज पुन्हा दिसली 
गोड कळी पुन्हा लाजली 
उमलता उमलता पुन्हा मिटली 
मिटता मिटता पुन्हा उमलली 
गोडी जीवनाची तिला कळली 
ओठी लाली पुन्हा उमटली 
गोड स्मित गोड डोळे 
चुकून गुपित काय बोलले 
प्रेम म्हणे मजला झाले 
वेडे मला 'त्याने' केले 
काय हे 'राधे' तू म्हणालीस 
वेडे तर तू मला केले
ऐक रे 'श्याम' ! प्रेम तुझे 
वेड मजला असे लाविते 
तुझेच गीत गात राहते 
स्वतःलाही मी विसरते 
'श्याम' रे! तू प्राण माझा 
सखा तूच पती माझा 
गोड प्रेम हे राधा बोले 
ऐकता ऐकता मन वेडे होते 
वेडा श्याम वेडी राधा 
प्रेमाची गोडी राधा 
राधेशिवाय प्रेम नं जगती
राधेनेच दिली भक्ती 
प्रेम हीच जीवनाची शक्ती 
    

Comments

  1. Prem hich jivanici shakti... Khup chan vatle...
    kavita far avadli:)

    ReplyDelete
  2. आरती, विचारयज्ञात हार्दिक स्वागत! तुम्हांला मराठी पण येते! मला वाटायचे पण नक्की माहित नव्हते. मला तुमची प्रतिक्रिया खूप खूप आवडली.

    ReplyDelete
  3. नमस्कार एस एम ! अति सुंदर प्रतिक्रिया ! धन्यवाद ! :)

    ReplyDelete
  4. really getting the knack of marathi day by day.
    superb.

    ReplyDelete
  5. Thanks a lot Pramodji! Really very very happy ! :) This is a bit vitamin to write more!

    ReplyDelete
  6. आपने मराठी में लिखा है क्या?

    ReplyDelete
  7. कुंवर कुसुमेशजी ! आपका विचारयज्ञ मे स्वागत है ! यह कविता मराठी मे है , यह ब्लॉग मराठी मे हि है , मराठी मेरी मातृभाषा है | इसलिये मराठी से लिखना शुरू किया | आपने अपना बहुमुल्य समय यहाँ आने के लिये दिया इसके लिये बहुत बहुत आभारी हूँ हृदयसे ! :) इसके अलावा हिंदी और इंग्लिश भी ब्लॉग है !

    ReplyDelete
  8. mohinee you are very talent ..really v nice :)

    ReplyDelete
  9. Hey Geeta! Thank you sooooooo muchhhhhh ! Sorry for the late reply......:)

    ReplyDelete

Post a Comment

हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........