'मी डोलकर डोलकर ... ' असं काहीतरी गाणं लहानपणी ऐकल्याचं आठवतं आहे ... पूर्ण तर नाही, पण फक्त एवढ्याच ओळी...थोडसं त्या चालीवर हे गाणं ........तुम्हाला आवडेलच ......
आम्ही राजकारणी, राजकारणी
राजकारणी भ्रष्ट राजे .........
भ्रष्टाचाराचे, भ्रष्टाचाराचे
सम्राट आम्ही सारे........
आम्ही सख्खे हो, सख्खे हो
सख्खे भाऊच सारे......
एकमेका हो, एकमेका हो
खाऊ घालितो आम्ही न्यारे ....
खवय्ये हो, खवय्ये हो
आम्हा सारिखे न दुजे.....
आम्हा चालती, चालती
अन्न म्हणून सारे ......
आम्ही 'आदर्श' , 'आदर्श'
भ्रष्टाचारात आम्ही "आदर्श"......
भ्रष्ट भ्रष्ट हो, भ्रष्ट भ्रष्ट हो
वाटे तुम्हा जे सारे.......
इष्ट इष्ट हो, इष्ट हो
इष्ट ते आम्हा न्यारे.............
आम्ही 'राजी' ने, राजी ने
देतो राजीनामा ......
कारण भाऊ हो भाऊ हो
बसविण्या आमुचा.....
आम्ही भ्रष्ट हो, भ्रष्ट हो.....
नतद्रष्ट न तुम्हासारिखे......
आम्ही खाउनी, खाउनी पोसितो
जग पुन्हा आमुचे.........
आम्ही राजकारणी, राजकारणी
आम्ही कलावंत मोठे......
नट मोठे हो, नट मोठे हो
अमुच्यासारीखे ना दुजे..........
स्वस्त जीवन , हो जीवन
वाटे आम्हा जनतेचे.......
मस्त जीवन, मस्त जीवन
जगतो आम्ही न्यारे....
आम्ही खेळाडू, खेळाडू
राजकीय खेळांचे....
आम्ही 'निरपेक्ष' 'निरापेक्ष'
सर्व 'धर्मा'हुनी निरपेक्ष ...........
आम्ही जाणीतो, जाणीतो
'एक' चि 'खरा' धर्म...........
प्रेम पैशाला, सत्तेला अर्पितो
आमुचा धर्म.............
आमच्याबद्दल जाणण एवढं सोपं नाही ..............जाणायला जाल तर, तुम्हीही फसाल .................
Aavadli mala kavita.. khup chaan
ReplyDeleteश्रीकांत धन्यवाद! खूप खूप !
ReplyDelete