कर्मभूमी ही ज्ञानभूमी ही ||
पुण्यभूमी ही भारतमाता || १ ||
शक्तीभूमी ही भक्तीभूमी ही ||
प्रेमभूमी ही भारतमाता || २ ||
शस्त्रभूमी ही शास्त्रभूमी ही ||
शांतीभूमी ही भारतमाता || ३ ||
मातृभूमी ही पितृभूमी ही ||
पुण्यभूमी ही भारतमाता || ४ ||
वीरभूमी ही शूरभूमी ही ||
संतभूमी ही भारतमाता || ५ ||
विश्ववंद्य ही विश्वगुरु ही ||
सनातन ही भारतमाता || ६ ||
शान्तिदात्री ही प्रेमदात्री ही ||
ज्ञानदात्री ही भारतमाता || ७ ||
गुरुभूमी ही शिष्यभूमी ही ||
प्रभूभूमी ही भारतमाता || ८ ||
Comments
Post a Comment
हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........