गणेशोत्सवानिमित्त श्रीगणरायाची स्तुती व प्रार्थना
प्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा संग्रहातून
चैतन्य आनंद वर्षे तव आगमनाने |
दिव्यभक्ती हृदयातुनि उठे आर्तभावाने || १ ||
आशा पवित्र तू निर्मिसी पृथ्वीवरी |
तव आशिष देई, कल्याणजन्म भक्तांसी || २ ||
वैभव श्रद्धेचे दृढ करिसी तू आमुच्या जीवनि |
ज्ञान विनय तू देसी, भक्तिमुक्ति देऊनि || ३ ||
हे गणेशा, गणपती, गणनायका |
हे विघ्नेशा, विघ्नहर्ता, विनायका || ४ ||
नमितो आम्ही स्तोत्र गाउनि सदा तुजला |
कृपा वर्षवुनिया तुझी, समृद्धी देई सदा जीवनाला || ५ ||
कल्याणजन्म: परमेश्वराच्या कृपेने अखंड भक्तिची प्राप्ती होणे म्हणजे भक्तांसाठी नवीन जन्मच असतो आणि हा नवीन जन्म मुक्त आणि जीवनाचे अभिष्ट म्हणजे संपूर्ण कल्याण प्राप्त केल्यानंतरच्या अवस्थेतला जन्म असतो. भक्ताचे संपूर्ण आयुष्यच मग ज्ञान, भक्ती व मुक्तिने तृप्त होते.
This Hymn in English:
विचारयज्ञमध्ये गणेशोत्सव विशेष प्रार्थना व लेख:
- नमन तुजला हे गजानना
- श्रीगणेश स्तवन: प्रार्थिता तुज हे गणपती
- गणपती उजव्या सोंडेचा की डाव्या? भ्रम, भीती, आणि वास्तव
- गणेशोत्सव आणि राष्ट्रभक्ती-पुन्हा सुरु होऊ शकते?
More Lord Ganesha Prayers and Posts from Narayankripa:
- Hymn: Empower Our Lives
- Shri Ganesha Dhyan Darshan
- Vighnaharta: A dedication to Lord Ganesha
- Adhyatmic Journey to Ichhapurti Ganesh Temple
Hindi Prayer from Chaitanyapuja: