कविता: प्रेमफुलं फुलताना

प्रेमावर प्रेमानेच केलेली कविता...


प्रेम शिकता येत नाही
प्रेम शिकवताही येत नाही
प्रेम करणं समजावता ही येत नाही
प्रेम फक्त जगता येतं
प्रेमात 'प्रेम' फक्त अनुभवता येतं

प्रेम शब्दांत बांधता येत नाही
प्रेम लिहिता आणि गाताही येत नाही
प्रेमात फक्त 'प्रेमच' बांधता येतं
आणि प्रेमाचं गाणं प्रेमच गातं

प्रेम जगायला शिकवतं
जग प्रेमाने जगायला शिकवतं
प्रेम शब्दांना प्रेमाने जगायला शिकवतं
जीवन देऊन फुलायला शिकवतं
प्रेम गीतानाही गायला शिकवतं
प्रेमच संगीत केवळ प्रेमच होतं

संगीताला सूर प्रेम देतं
सुरांना जीवन प्रेम देतं
प्रेमाचा राग, आपलंच गीत
आपलेच सूर प्रेम गातं

प्रेम खूप गोड असतं
गोडीलाही गोडीचा अर्थ प्रेमच देतं
गोडीलाही स्वत:च्या गोडीचा अनुभव प्रेम देतं
प्रेमाचा गोडवा प्रेमच सांगतं

प्रेम व्यक्त करता येत नाही
प्रेम स्वत:च अभिव्यक्त होत असतं
प्रेमाच्या छंदांनी प्रेमकाव्य फुलंत जातं  
प्रेम आपल्या प्रेमानेच
प्रेमफुलांना जीवन देतं
प्रेमफुलं फुलताना मायेची सावली प्रेमच बनतं
प्रेमस्पर्शाने प्रेम प्रेमाचा सुगंध पसरवितं

This poem in Hindi:



विचारयज्ञ मध्ये अन्य कविता: