श्रीगणेश स्तवन - 'प्रार्थिता तुज हे गणपती'

आज गणरायांच्या आगमनाने प्रत्येक घर आनंदले आहे. खेड्यापाड्यात - शहरा -नगरांत अगदी सगळी कडे चौकाचौकात अवर्णनीय उत्साह आणि आनंद वाहतो आहे. कारण, आपला सगळ्यांचा लाडका पाहुणा, आपला गणपती बाप्पा दहा दिवस आता आपल्याकडे राहणार आहे, आपले मोदक, लाडू, खिरापत आणि मनोभावे केलेली पूजा या सगळ्यांचा स्वीकार करणार आहे.





आपला हा दिव्य आनंद आणि उत्साह अजूनच दिव्य व्हावा यास्तव

गणेश - स्तवन - प्रार्थिता तुज हे गणपती ....


नवआरंभ करिता जीवनी
प्रार्थिता तुज हे गणपती |
यश देसी सदा आम्हांसी
पराजय न ठाऊक तुजमुळे || १ ||

 ज्ञान आणि बुद्धीस्तव
प्रार्थिता तुज हे श्रीगणेश |
मस्तिष्क व हृदय उजळविसी
ब्रह्म - ज्ञान - भक्ती योगे || २ ||

सद्गुण दिव्य प्राप्त होण्या
प्रार्थिता तुज हे लंबोदरा |
अंत:करण शुध्द करुनि
आनंद जीवनी प्रकाशविसी || ३ ||

निर्विघ्न होण्या कार्य सिद्ध
प्रार्थिता तुज हे विनायक |
हरुनि विघ्ने सारी तत्क्षण
यशानंद देसी भक्तां || ४ ||

हरिली तू विघ्ने सारी
जीवन पूर्ण आनंदविले
आता प्रार्थना एक उरली
राष्ट्रकार्य सिद्ध करावे || ५ ||

शत्रूंचा साऱ्या ह्या राष्ट्राचा
बिमोड व्हावा पूर्णपणे |
सुख - शांती नांदो चोहीकडे
पुन्हा व्हावी धर्मस्थापना || ६ ||

हेच काव्य इंग्रजी रुपातही प्रसिद्ध झाले आहे नारायणकृपा वर : श्री गणेश ध्यान दर्शन - Shri Ganesh Dhyan Darshana 

Comments

  1. Mala hi Kavita khup aavadli!! Sorry, but I know only little Marathi :)

    Happy Ganesha Chaturthi to you and your family Mohini, I hope he take away all your pain and sadness and gives you all the success :)

    ReplyDelete

Post a Comment

हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........